पैशाचे मूल्य ओळखणे हीच त्याची खरी किंमत.

तुमचे डोमेन पुढील मोठ्या स्टार्ट-अप किंवा ब्रॅण्डचे नाव असू शकते. पण काय महत्त्वाचे आहे ते तुम्हाला कसे समजणार? GoDaddy डोमेन मूल्यांकने तुम्हाला अत्यंत अचूक अंदाजे किंमत सांगतात. आमच्या विशेष अल्गोरिदममध्ये आमच्या 20 वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेला रिअल-मार्केट सेल्स डेटा, मशीन लर्निंगमध्ये एकत्रित केलेला आहे. अखेरीस आम्ही जगातील सर्वात मोठ्या डोमेन नोंदणीकर्ता म्हणून लाखो डोमेनचे व्यवस्थापन करतो आणि आम्ही सर्वात मोठे आफ्टर मार्केटमधील डोमेन नावाचे विक्रेते आहोत, म्हणून आम्हाला या क्षेत्रातील अनुभव आहे. तुम्हाला पुढील निर्णय घेणे सोपे व्हावे म्हणून तुम्हाला तुलनात्मक डोमेन्स आणि त्यांच्या किमतीचे काही नमुने देखील दिले जातात.

आणि हे सर्व अगदी विनामूल्य.

 
₹1,66,241.14 कसे वाटते?
GoDaddy लिलावामध्ये डोमेनसाठी 2017 मध्ये ही सरासरी विक्री किंमत होती. तुमचा निर्णय घ्यायला तयार आहात? GoDaddy लिलावांसाठी साइन अप करा. तुम्ही आमच्या प्रचंड डोमेन आफ्टरमार्केटचा वापर करू शकता, जिथे तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या डोमेन्सची खरेदी -विक्री करू शकता. तसेच, तुम्हाला आमचे मल्टि-बिडिंग टूल आणि आमच्या डेली जेम्स डोमेन डील्सचा वापर करता येतो. 78 दशलक्ष अंतर्गत डोमेन व्यवस्थापनावरून डोमेन गुंतवणूकदरांचा फायदा कशामध्ये आहे हे आम्हाला समजू शकते. आजच GoDaddy लिलावाने सुरुवात करा.
 
illus-feature-real-state-without-mortgage
हे रिअल इस्टेटसारखेच आहे, परंतु यासाठी कोणत्याही तारणाची गरज नाही.
असे म्हणू या की तुमचे डोमेन हे एखाद्या जमिनीच्या तुकड्यासारखे आहे. त्या जमिनीवर घर बांधणे म्हणजे तुमच्या डोमेन नावाचा वापर करून वेबसाइट तयार करणे. पण तुम्ही बांधकामाला अजून सुरुवात केली नसेल, तर तुमच्या मोकळ्या जमिनीच्या प्लॉटला अजूनही काहीतरी किंमत आहे, बरोबर? ते म्हणजेच तुमचे डोमेन. कदाचित तुम्ही या (डोमेन) संकल्पनेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकला नाही आहात, पण तुमच्या डोमेनमध्ये वास्तविक मूल्य आहे - आणि हे आम्ही आमच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाने खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो आहोत. शेवटी, आम्ही 78 दशलक्ष डोमेन्स व्यवस्थापित करतो आहोत आणि आम्ही जगातील सर्वात मोठा डोमेन नोंदणीकर्ता असल्याने आमच्याकडे त्या डोमेनच्या पुनर्विक्रीसाठी लागणारी सर्व माहिती आहे.
illus-you-got-your-domain-value-now-what
तुम्हाला तुमच्या डोमेनची किंमत समजली आहे.
आता पुढे काय करायचे?

खरे तर, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या डोमेनची किंमत येथे वापरू शकता:

डोमेन खरेदी करा. तुमच्या मालकीचे नसले तरी तुम्हाला कोणत्याही डोमेनचे मूल्यांकन मिळू शकते. तुम्हाला एखादे डोमेन खरेदी करायची इच्छा असल्यास, हे मूल्य जाणून घेण्यासाठी आमचे मूल्यांकन टूल वापरून खरेदी करणाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी आणि ऑफर देण्यासाठी आमची डोमेन ब्रोकर सेवा वापरा.

तुमच्या डोमेनचे नूतनीकरण करा. तुमचे डोमेन, ही एक गुंतवणूक आहे असे समजा आणि त्याची किंमत अजून वाढते आहे किंवा नाही यासाठी त्यावर लक्ष ठेवा.

तुमचे डोमेन विका. तुमचे डोमेन नाव बऱ्याच काळामध्ये वापरले नाही आहे? आता काय उपयुक्त आहे हे तुम्हाला समजले आहे, आमच्या “लिलाव” साइटवर तुमच्या डोमेनला सूचीबद्ध करा आणि इतरांना त्यावर बोली लावू द्या, किंवा तुम्ही स्वतःच विका.

रस्त्यांवरील चर्चा.

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

डोमेन मूल्यांकन म्हणजे काय?

GoDaddy डोमेन मूल्यांकन डोमेन नावाच्या मूल्याचा अचूकपणे अंदाज लावण्यासाठी मशीन लर्निगचा वापर करते. मोठ्या प्रमाणामधील डेटा आणि वर्ड टोकनायझेन वापरून, आम्ही एक मॉडेल तयार केले आहे, जे वापरून डोमेनचे मूल्य करता येऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर, डोमेन मूल्यमापन टूलमुळे तुमच्या डोमेनच्या किमतीचा अंदाज लावताना लागणारी तर्कशक्तीची अजिबातच आवश्यकता भासत नाही. नेमक्या शब्दामध्ये तुमच्या डोमेन नावाचा विचार करून अत्यंत प्रभावीपणे आमचे डोमेन मूल्यमापन केले जात असल्याने, तुम्ही डोमेनचे नाव निवडता तेव्हा मुख्य SEO अटींसह याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे.

मी GoDaddy डोमेन मूल्यांकनाचा कसा वापर करू शकतो?

जर तुमचे डोमेन कालबाह्य होण्याच्या मार्गावर असेल आणि तुम्हाला त्याचे नूतनीकरण करायचे नसेल तर ते विकण्याचा विचार करा. तुम्ही सोन्याच्या खाणीवर बसला आहत. तुम्हाला त्या डोमेनचे नूतनीकरण करायचे असल्यास तुमच्या डोमेनचे मूल्य जाणून घेतल्याने तुम्हाला त्याचा वापर संदर्भात विचार करण्यास मदत होऊ शकते. जर तुमचा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा विचार असेल तर तुम्ही ते विकायचा विचार देखील करू शकता कारण तसेही त्या डोमेनचा तुम्हाला काही उपयोग नाही आहे. तुमचा योग्य निर्णय झाल्यानंतर GoDaddy च्या आफ्टरमार्केटमध्ये तुम्ही तुमचे डोमेन विकू शकता.

अन्य नोंदणीकर्त्यांकडे नोंदणी केलेली डोमेन्सचे देखील GoDaddy मूल्यांकन करतात का?

GoDaddy इतर कोणत्याही नोंदणीकर्त्यांकडील डोमेन नावाचे मूल्यांकन करू शकतात, परंतु आमच्याकडे सामान्यपणे, इंग्रजी भाषेवर आधारित डोमेन्सची सर्वोत्तम अचूकता आहे.

GoDaddy माझ्या संपूर्ण डोमेन पोर्टफोलिओचे मूल्यमापन करते का?

होय,GoDaddy यांच्याकडे असलेले सर्व डोमेन पोर्टफ़ोलिओचे मूल्यमापन करण्यासाठी संसाधने आहेत. जेव्हा तुमच्याकडे मौल्यवान डोमेन असते जे तुम्ही नूतनीकृत, संरक्षित करणे आवश्यक असते किंवा ते विकायचा तुमचा विचार पक्का झाला की (जर ते घेतल्यापासून वापरलेच नसेल) आम्ही तुम्हाला “माझी डोमेन्स” आणि तुमच्या GoDaddy खात्यावरून कळवू.

विकसित वेबसाइट्ससाठी GoDaddy डोमेन मूल्यमापन सेवा देते का?

GoDaddy विकसित वेबसाइट्सचे मूल्यमापन करत नाही, परंतु कोणत्याही डोमेनशी संलग्न असलेल्या वेबसाइटचा विचार न करता आम्ही कोणत्याही डोमेनसाठी डोमेन मूल्यमापन सेवा देऊ शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, आम्ही विकसित वेबसाइट विचारात न घेता, आम्ही केवळ URL विक्रीच्या किमतीचा अंदाज बांधतो. हे करण्यासाठी, आम्ही विकलेल्या डोमेनची किंमत इतर ऐतिहासिक डोमेनशी तुलना करतो ज्यामध्ये विकसित वेबसाइटची विक्री समाविष्ट झालेली नसते.