तुम्हाला डोमेन नावाची आवश्यकता का आहे?

सर्वात यशस्वी व्यवसाय ग्राहकांच्या सर्व स्पर्शबिंदूंना शब्द आणि प्रतिमांचा समान संच वापरतात - त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या ईमेल्समध्ये आणि ऑर्डरच्या पुष्टीमध्ये, त्यांच्या स्वाक्षऱ्यांवर इ. हे सर्वात सोपे ब्रँडिंग आहे. आणि तुमच्या ब्रँडचे सर्व डिटिजल भाग तुमच्या डोमेन नावातूनच येतात.

graphic/icon/object/domain-registration-blue-edit-88px Created with Sketch.
आपला दावा हिस्सा
तुमच्या मोठ्या कल्पना किंवा व्यवसाय नावाशी निगडीत डोमेन्स नोंदविण्यामुळे तुमच्या वेबसाईटवरून रहदारी खेचण्यासाठी ती नावे वापरण्यापासून इतरांना दूर राखले जाते.
graphic/icon/browser-windows/multiple-sites-bulk-yellow-export-88px Created with Sketch.
नियंत्रण घ्या
डोमेन नावासह, तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा ग्राहक, मित्र व संभाव्य ग्राहकांना पाठवू शकता - मग ती वेबसाईट, ब्लॉग, सामाजिक पृष्ठ किंवा स्टोअरफ्रंट काहीही असो.
graphic/icon/browser-windows/securtity-protection-magenta-export-88px Created with Sketch.
तुमच्या अधिकारांचे संरक्षण करा.
तुमचे डोमेन तुम्हाला डिजिटल रिअल इस्टेटचा एक खास तुकडा देते जो तुमच्याकडे नोंदविलेला असेपर्यंत दुसऱ्या कोणालाही वापरता येत नाही.
feature-domain-category-why-a-domain-name-v2
तुमची कल्पना ऑनलाईन मांडण्यासाठी तयार आहात?
तुम्हाला सुरुवात करता यावी यासाठी हे काही पर्याय आहेत.
सर्व पाहा

तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी दिसत नाहीत? आणखीही आहे.

अगदी अलीकडेपर्यंत, निवड करण्यासाठी दोन डझनहून कमी डोमेन विस्तार होते – यामध्ये .com, .net आणि.org, ह्या काही लोकप्रिय नावांचा समावेश होता. आता तुम्हाला निवड करण्यासाठी अक्षरशः शेकडो आहेत.

icn-a-web-address-theyll-remember-88px
त्यांना लक्षात राहील असा वेब पत्ता
नवीन डोमेन्स लक्षात ठेवण्यासाठी सुलभ आहेत कारण ती तुमच्या उद्योग किंवा स्थानासाठी विशिष्ठ आहेत. तुमच्या फोटोग्राफीच्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे? .photos किंवा .photography वापरून पाहा. नवीन मस्त हॉटेल उघडताय? .cafe किंवा .pub वापरून पाहा. आणि तुमच्या मुलांच्या सॉकर टीम किंवा शेजारील पुस्तकाच्या समुहासाठी .club पेक्षा चांगलं दुसरं काहीच नाही.
icn-the-chance-to-promote-your-location-88px
तुमच्या स्थानाची जाहिरात करण्याची संधी
स्थानिक ग्राहकांना सेवा देणारा व्यवसाय आहे? तुमच्या देशाचे डोमेन नाव पाहा, कॅनडासाठी .ca आणि युकेमधील व्यवसायांसाठी .co.uk. जर तुमची उत्पादने किंवा सेवा एखाद्या ठराविक ठिकाणी लोकप्रिय असतील तर हे पर्याय चांगले आहेत कारण लोक अनेकदा “उत्पादन + स्थान” शोधतात.
icn-why-limit-yourself-88px
आधीपेक्षा खूप जास्त पर्याय
स्वतःला क्लासिक डोमेन्ससाठी मर्यादित का ठेवायचे? आता उपलब्ध असलेल्या शेकडो नवीन डोमेन नावांमुळे तुमच्या कल्पना व व्यवसायासह चपखल जुळणारा वेब पत्ता शोधण्याच्या तुमच्या शक्यता काही पटींमध्ये वाढतात.
feature-domain-category-there-is-more

एक मस्त डोमेन मिळाले आहे? त्याचे तुम्ही काय करू शकता ते इथे दिले आहे.

feature-domain-category-most-popular-uses
  • त्यावर एक नवीन वेबसाईट निर्माण करा किंवा आणखी पाहुणे आकर्षित करण्यासाठी तुमचे डोमेन नाव विद्यमान वेबसाईटकडे अग्रेषित करा.

  • ग्राहकांसह शेअर करायला तुम्हाला अभिमान वाटेल असा व्यावसायिक ईमेल पत्ता तयार करा.

  • Facebook, Twitter, Instagram आणि इतर सामाजिक व्यासपिठांवर तुम्हाला शोधणे ग्राहकांसाठी सुलभ बनवा. अधिक जाणून घ्या

  • खात्रीलायक नावांमध्ये गुंतवणूक करा जी तुम्ही नंतर फायद्यासाठी विकू शकता.

feature-domain-category-word-about-privacy
गोपनीयतेबद्दल एक शब्द.
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीकडे डोमेन नावाची नोंदणी करता तेव्हा नियुक्त केलेली नावे आणि नंबर्स साठीचे इंटरनेट कॉर्पोरेशन (ICANN) ला आवश्यक असल्यानुसार तुमचे नाव, पत्ता आणि फोन सार्वजनिक WHOIS डेटाबेसमध्ये प्रकाशित होत. स्पॅम, घोटाळे आणि ओळख चोरण्यासाठी वापरता येणारे ईमेल व पत्ते गोळा करण्यासाठी ईमेल आणि टेलिफोन स्पॅमर्स हा डेटाबेस बारकाईने धुंडाळतात. याचे उत्तर म्हणजे गोपनीयता संरक्षण.

सर्व तपशीलांबाबत आमच्यावर विश्वास ठेवा.

GoDaddyअपघाताने जगातील सर्वात मोठा नोंदणीकर्ता बनलेला नाही. आम्ही तुमच्या डोमेनच्या सर्व गरजा हाताळू शकतो.

जगातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठेत पैसे कमवा.
आमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या गुंतवणूकदार साधनांसह डोमेन नावे खरेदी व विक्री करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी एखादे डोमेन नाव कसे मिळवावे?

  1. डोमेन नाव विस्तारणाचा विचार करा. विस्तारण म्हणजे डोमेन नावाच्या शेवटी असलेला भाग आहे – उदाहरणार्थ - .net, .biz, .org किंवा .com.

  2. डॉटच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय असलेले आवडेल त्याचा विचार करा. ते तुमच्या व्यवसायाचे नाव असू शकते किंवा तुमची खासियत.

  3. तुम्हाला हवे असलेले डोमेन या पृष्ठाच्या वरच्या बाजूच्या चौकटीत टाईप करा. ते विशिष्ट डोमेन उपलब्ध आहे का हे आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्हाला त्याहून अधिक आवडू शकतील अशी इतर नावे दाखवू.

  4. त्यापैकी एक निवडा, ते तुमच्या कार्टमध्ये समाविष्ट करा आणि चेक आउट करा. आता तुमच्या स्वतःच्या डोमेनचे तुम्ही एक अभिमानी मालक आहात. जोपर्यंत ते तुमच्यासाठी नोंदविलेले आहे, तोपर्यंत इतर कोणीही ते वापरू शकत नाही.

चांगले डोमेन शोधण्यासाठी काही टिप्स आहेत का?

‌> लक्षात ठेवण्याजोगे करा. म्हणूनच अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाचे नाव असलेली डोमेन्स मिळवितात. काही लोक - बॉब पार्सन्ससह - त्यांना आवडलेले डोमेन मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाचे नाव निवडतात.

> व्यापार चिन्हांकित असलेले, कॉपी राईट घेतलेले किंवा इतर कंपनी वापरत असलेले नोंदवू नका. यामुळे डोमेन गमवावे लागेल आणि/किंवा कायदेशीर समस्या निर्माण होतील.

> सहसा संक्षिप्त नाव केव्हाही चांगले कारण ग्राहकांना ते लक्षात ठेवायला सोपे असते. Facebook, Twitter आणि तुमची जी इतर सामाजिक मीडियाची खाती असतील त्यांच्याशी जुळणारी वापरकर्ता नावे मिळवणेही सोपे आहे.

> स्थानिक व्यवसाय आहे? आपला शेजार, शहर किंवा देश तुमच्या डोमेनमध्ये समाविष्ट करा म्हणजे तुम्ही कुठे आहात ते स्थानिक ग्राहकांना त्वरित समजेल. तुमच्या भागासाठी एखादे आहे का हे पाहण्यासाठी भौगोलिक डोमेन विस्तारणांची यादी पाहा, जसे की berlin, .nyc.

> संख्या किंवा हायफन्स टाळा. तुमचा वेब पत्ता ऐकणाऱ्याला तुम्ही अंक (5) वापरत आहात किंवा “पाच” वापरत आहात ते समजणार नाही. जर तुमच्या व्यवसाय नावामध्ये संख्या असेल तर, दोन्ही आवृत्त्यांची नोंदणी करा - अंकातील संख्येसह आणि शब्दातील संख्येसह. डॅशेसमुळे फक्त अडचणीच निर्माण होतात आणि अव्यावसायिक दिसतात.

> एकापेक्षा जास्त मिळवा. तुमच्या वेबसाइटवरील अभ्यागतांची संख्या जशी वाढेल तसे कदाचित तुमच्या साइटची नक्कल करणाऱ्यांचे तुमच्याकडे लक्ष वेधले जाऊ शकते, जे तुमचे अभ्यागत त्यांच्याकडे खेचून घेण्याच्या आशेने तशीच डोमेन नावे मिळवतील. एक समान किंवा चुकीचे स्पेलिंग असलेली डोमेन्स लवकर नोंदवून ठेवा म्हणजे नंतर ही समस्या येणार नाही.