काही मदत हवी आहे? स्थानांतरण कंसीयज यांना 040 67607600 येथे कधीही कॉल करा

स्थानांतरण का करावे?

तुम्ही कदाचित येथे आहात कारण तुमच्या सध्याच्या डोमेन प्रदात्यास तुम्हाला आवश्यक असलेली सेवा आम्ही देत नाही, तुम्हाला केवळ तुमची मालमत्ता एकत्रित करायची आहे किंवा ही केवळ बदल करण्याची वेळ आहे. ही प्रक्रिया शक्य तितकी सोपी बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही तिचा वापर सहजतेने करू शकता.

"मला डोमेन नावाचे स्थानांतरण, साइटचे स्थानांतरण, ईमेलचे स्थानांतरण इ. सारख्या अनेक समस्या होत्या. ग्राहक सेवा संघाने एकत्रित पॅकेज माझ्या समोर सादर केले, माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि स्थानांतरण पूर्ण करण्यास मदत केली.”

Cameron Baker & Associates

आता काय करायचे?

पुढे काय करायचे समजत नाही आहे? तुम्ही कोठेतरी अडून राहिला आहात आणि त्वरित निवारण हवे आहे? आम्ही आमच्या पुरस्कार विजेत्या तांत्रिक साहाय्याक संघासह तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत.

डोमेन स्थानांतरणाविषयी अधिक जाणून घ्या.

मी GoDaddy यांच्याकडे डोमेन स्थानांतरण का केले पाहिजे?

GoDaddy डोमेन स्थानांतरणासाठी प्रत्येक नावाकरिता शुल्क आकारतात, जेणेकरून तुम्हाला हा सुरुवातीचा खर्च आणि लागू असेल तेथे ICANN नोंदणी शुल्क इतकीच रक्कम भरावी लागते. आम्ही तुमचे डोमेन तुमच्या सध्याच्या नोंदणी शुल्कावर कधीही तसेच राखून ठेवू - आणि प्रत्येक स्थानांतरणासाठी तुम्हाला वर्षभर विनामूल्य नोंदणी करू देऊ*. तुम्ही किती डोमेन्स स्थानांतरित करत आहात त्यानुसार हे लक्षणीय बचतीच्या रूपात समाविष्ट केले जाऊ शकते.

माझी डोमेन्स स्थानांतरित करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात का?

डोमेन्स जवळजवळ कधीही स्थनांतरित केली जाऊ शकतात. परंतु ICANN नोंदणीपासून 60 दिवसांमध्ये किंवा किंवा स्थानांतरणपूर्वी डोमेन स्थानांतरण निर्बंधित करतात (.au अपवाद आहे). ICANN धोरण


मी GoDaddy यांच्याकडे डोमेन्स कशाप्रकारे स्थानांतरित करू?

  1. व्यवस्थापकीय (अॅडमीन) संपर्कासाठी प्रत्येक डोमेनवर सूची केलेले ईमेल पत्ते अद्ययावत आहेत का याची खात्री करा. तुमचा वर्तमान नोंदणीकर्ता या पत्त्यांचा उपयोग करुन स्थानांतरण प्रक्रियेच्या वेळी तुमच्याशी संपर्क साधेल. .au डोमेन्ससाठी व्यवस्थापकीय संपर्काला निबंधक संपर्क असे म्हणतात..

  2. यानंतर तुम्हाला स्थानांतरण करायचे आहे अशा प्रत्येक डोमेनला अनलॉक करा. तुमच्या सध्याच्या नोंदणीकर्त्याला ते कसे करायचे याची माहिती घेण्यासाठी संपर्क करा.

  3. तुम्हाला तुमच्या वर्तमान नोंदणीकर्त्याकडून प्राधिकृत कोडची आवश्यकता भासू शकते (कधीकधी स्थानांतरण कळ (की) किंवा EPP कोड असे म्हणतात). सर्व परिस्थितीमध्ये हे आवश्यक नसते उदा. तुम्ही कंट्री-कोड टॉप लेव्हल डोमेन नावे (ccTLDs) स्थानांतरित करीत असताना. जर प्राधिकृता कोड्स तुमच्या खाते व्यवस्थापकामध्ये दाखवले जात नसतील तर तुमच्या सध्याच्या नोंदणीकर्त्याला त्यांना ईमेल करायला सांगा.

  4. आमच्या बल्क डोमेन स्थानांतरण टूलनेमध्ये प्रत्येक डोमेनला एका स्वतंत्र ओळीवर सूचीबद्ध करून एकावेळी तुमच्या डोमेन नावांपैकी जास्तीत जास्त 500 GoDaddy डोमेन स्थानांतरण खरेदी करा. तुम्हाला स्थानांतरित करायचे असलेले विस्तारण सूचीबद्ध केले नेल्यास तुम्ही त्या डोमेनला आमच्याकडे स्थानांतरित करु शकता.

तुमचे स्थानांतरण नेमसर्व्हर्स निवडा मेनूमध्ये आणि खालीलपैकी एक पर्याय निवडा:

अ) माझे वर्तमान नेमसर्व्हर्स ठेवा. जर तुमचे स्थानांतरित डोमेन नाव सक्रिय वेबसाइटशी निगडीत असेल तर या विकल्पाला निवडून खात्री करा की स्थानांतरणाच्या दरम्यान साइटमध्ये अडथळा येणार नाही.

ब) GoDaddy यांच्या पार्क नेमसर्व्हर्सना मध्ये बदला. डोमेन नावासाठी तुमचा ईमेल आमच्याकडे असल्यास आणि तुम्ही आमचे ऑफ साइट DNS वापरत असाल तर किंवा प्रिमियम DNS स्थानांतरण टेम्प्लेट स्थानांतरणाच्या आधी तयार केली असल्यास हा पर्याय निवडा.

नोट: जर तुम्ही हा पर्याय निवडला आणि तुम्ही आमचा ऑफ साइट DNS किंवा प्रिमियम DNS स्थानांतरण टेम्प्लेट वापरत नसाल तर आम्ही आमच्या पार्किंग डोमेन सर्व्हर्समध्ये डोमेनचे नाव पार्क करतो आणि तुमच्या खात्यात डिफॉल्ट झोन फाइल तयार करतो. तुम्ही DNS व्यवस्थापक झोन फाईल संपादक वापरु शकता ज्यामुळे नवीन झोन फाइल सानुकूल करता येईल. अधिक माहितीसाठी, तुमच्या डोमेन नावांसाठी DNS व्यवस्थापन पहा.

कृपया लक्षात घ्या की.uk, .ca, .eu, .es, .se आणि .au डोमेन नावे GoDaddy यांच्याकडे स्थानांतरित करण्यासाठी तेथे विशेष सूचना आहे.

माझ्या डोमेन स्थानांतरणाला किती वेळ लागेल?

बहुतांशी डोमेन स्थानांतरणे पाच ते सात दिवसांमध्ये पूर्ण होतात. विस्तारणानुसार लागणारा वेळ बदलतो. कंट्री-कोड टॉप लेव्हल डोमेन्स (ccTLDs) स्थानांतरणाच्या तपशिलासाठी ccTLDs विषयी येथे जा आणि तुमच्या डोमेन विस्तारणासाठी मदत लेखावर क्लिक करा.

मी माझ्या बल्क डोमेन हस्तांतरणाची क्रमशः प्रगती पाहू शकतो/ते का?

निश्चितच. खालील पायऱ्यांचे अनुसरण करून तुमच्या स्थानांतरणाची क्रमशः प्रगती जाणून घ्या:

  1. माझे खाते मध्ये लॉग इन कराGoDaddy.

  2. डोमेन्स च्या शेजारील, लाँच बटणावर क्लिक करा.

  3. वरच्या डाव्याबाजूचा डोमेन्स मेनू खाली खेचा आहे आणि प्रलंबित स्थानांतरणे क्लिक करा. प्रत्येक स्थानांतरित डोमेन नावासाठी तुम्ही खालील माहिती पाहणे आवश्यक आहे:

    स्थिती - हे आपल्याला आपण स्थानांतरण प्रकियेत कुठे आहात ते सांगते. कोणत्याही स्थानांतरणासाठी प्रगती पट्टीवर फिरवा, ? चिन्हावर क्लिक करा, किंवा आवश्यक कृती किंवा तपशिलासाठी त्रुटी लिंकवर क्लिक करा.

    प्राधिकृत ईमेल - हे क्षेत्र त्या डोमेन नावावर लिंक केलेला ईमेल पत्ता दाखविते.

स्थानांतरण न केलेल्या प्रलंबित डोमेन्सची सूची शोधण्याच्या पद्धती

माझ्या डोमेनची देखभाल करण्यासाठी मला कधी आणि किती शुल्क आकारले जाईल?

तुमच्या डोमेनच्या कालबाह्यतेनंतर तुम्हाला डोमेन सुव्यवस्थित करण्यासाठी दरवर्षी शुल्क आकारले जाईल. किंमत ही डोमेनवर लागू होणरी तत्कालीन वार्षिक किरकोळ किंमत आहे.

*,** अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव