indian-testimonial-tilala-img-02-v01

Jay Khodiyar Machine Tools
श्री. तिलाला

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: जय खोदियार मशीन टूल्स
वेबसाइट: jaykhodiyaragrotech.com
स्थापना: 1994
GoDaddy आम्हाला मदत केली: आत्मविश्वासाने आमचा व्यवसाय जगापर्यंत पोहोचवण्यात मदत करणारी एक व्यावसायिक वेबसाइट तयार करा.
निष्कर्ष: विश्वासार्ह, सुरक्षित सर्वर्सवरील एक वेबसाइट जी व्यवहार आणि व्यवसाय वृद्धिची पुढील पातळीचे व्यवस्थापन करु शकते. श्री. तिलाला यांच्यासाठी याचा अर्थ मनःशांती असा आहे.

उत्पादनांची क्षणचित्रे

डोमेन: ऑनलाईन व्यावसायिक ओळख मिळाल्याने JKMT ला भारतातील आणि दक्षिण आशियामधील या उद्योगातील सर्वात मागणी असलेला उत्पादक म्हणून स्थापित होण्यात मदत मिळाली.

वेब होस्टिंग: GoDaddy कडून अमर्याद डिस्क स्पेस आणि बँडविड्थ सोबत समर्थनामुळे, विश्वासार्ह समर्थन मिळाले आणि वेबसाइटवरील वाढत्या व्यवहारांचे व्यवस्थापन करता आले.

ई-मेल: GoDaddy द्वारे वैयक्तिकृत ईमेलमुळे JKMT ला आपल्या व्यवसायाची ओळख स्थापित करता आली त्यामुळे ग्राहक जगभरात त्यांचा ब्रँड ओळखू लागले.

उर्जा निर्मिती

हरित विश्व प्रत्येकालाच आवडते. परंतु ते हरित ठेवण्यासाठी श्री. संजय हलाला, व्यवस्थापकीय संचालक, जय खोदियार मशीन टूल्स (JKMT) यांच्यासारखे फारच थोडे जण त्याला मोहीमेचे रुप देतात.

1994 मध्ये स्थापित, JKMT बायोमास ब्रिक्वेटींग मशीन्सची निर्मिती करते. ही मशीन्स शेती, वने आणि नगरपालिकेच्या कचऱ्याचे रुपांतर बायोमास ब्रिकेट्समध्ये, म्हणजे कोळसा आणि दगडी कोळशाला एक जैव-इंधन पर्यायामध्ये करतात. हे ब्रिकेट्स औद्योगिक बॉईलर्सना उष्णता देण्यात आणि वाफेपासून वीज तयार करण्यात वापरले जातात. भारत आणि अन्य विकसनशील देशांमध्ये जिथे ऊर्जा स्रोत फार व्यापकपणे उपलब्ध नाहीत तिथे, बायोमास ब्रिकेट्सचा वापर सामान्य आहे.

JKMT गुजरातमधील राजकोट येथे स्थित आहे, राज्यातले हे चौथे मोठे शहर आहे जिथे अनेक लघु स्तर निर्माण उद्योग प्रथापित होत आहेत. कंपनीला या अपरिहार्य गरजेमध्ये आणि या उद्योगांमधील ऊर्जेसाठी मागणीमध्ये लवकरच यश मिळाले. आज, JKMT अतिशय मागणी असलेला उत्पादक आहे, भारत तसेच दक्षिण आशियामधेही.

इंटरनेट हे श्री. तिलाला यांचा नजिकचा भागीदार राहिले आहे, आणि त्यांनी कंपनीची वेबसाइट jaykhodiyaragrotech.com द्वारे आपला व्यवसाय कमी-खर्चिक पद्धतीने जगभरात यशस्वीपणे प्रसारित केला आहे. यातून भरपूर फायदा होत आहे आणि त्यांची विक्री आणि विपणन प्रयत्नांचा हा मुख्य हिस्सा आहे. श्री. तिलाला सांगतात की त्यांच्या वेबसाइटवर दर महिन्याला 10 जण चौकशी करायचे, परंतु ही संख्या गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता त्यांच्याकडे दररोज जवळपास 50 लोक चौकशी करतात.

जेव्हा केवळ पृष्ठ पाहणे पुरेसे नसते

JKMT ची जबरदस्त वृद्धि आणि आपल्या वेबसाइटवर वाढत्या संख्येतील चौकशींचें व्यवस्थापन करण्यासाठी, श्री. तिलाला यांना एक भागीदार हवा होता जो त्यांच्यासाठी थोडी आणखी पावले उचलेल. त्यांना एक असा भागीदार हवा होता जो विश्वासार्ह समर्थन देईल आणि त्यांच्या वेबसाइटवरील वाढत्या व्यवहाराच्या मागण्यांचे व्यवस्थापन करेल. इंटरनेटवरील एका मित्राने GoDaddy ची शिफारस केली.

“GoDaddy ची विश्वासार्ह सर्वर्सकरिता असलेल्या मान्यतेने हा करार झाला,” असे श्री. तिलाला म्हणतात. “त्यांची स्पर्धात्मक किंमत आणि माझ्या व्यवसायाशी वैयक्तिकृत उत्कृष्ठ ग्राहक सेवा मला दररोज, मी योग्य निर्णय घेतला असल्याची आठवण करून देते.”

ग्राहक सेवा जी दूरवर पोहोचते

श्री. तिलाला यांनी त्यांचे डोमेन नाव आणि वेब होस्टिंग GoDaddy यांच्याकडे हस्तांतरित केले आणि 2012 च्या अखेरीस एक ईमेल खाते उघडले. “अगदी पहिल्या कॉलपासून, माझ्या लक्षात आले की मी योग्य निर्णय घेतला आहे,” ते म्हणाले.

एक नवीन वेब होस्ट निवडण्याने आव्हाने उभी राहिली. श्री. तिलाला यांना आरंभिक सेटअपमध्ये GoDaddy सोबत अनेक वेळा संपर्क करावा लागला. त्यांच्या कॉल्सनात तत्काळ उत्तरं मिळाली “तीन रिंग्जच्या आत,” आणि ज्ञानपूर्ण GoDaddy प्रतिनिधीने यशस्वीरित्या त्यांची समस्या सोडवून चिंता दूर केली. “मी तांत्रिक बाबतीत फारसा तज्ञ नाही. GoDaddy च्या ग्राहक सेवेने माझ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे दिली जेणेकरुन मी कोणतेही IT शब्दार्थ न वापरता समजू शकलो.”

मार्गातील प्रत्येक पावलावर एक विश्वासू भागीदार

श्री. तिलाला GoDaddyची प्रशंसा करतात. त्यांना विश्वास आहे की GoDaddy सोबत भागीदारी करण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा आहे कारण त्यांचा व्यवसाय नव्या उंचीवर पोहोचेल. “त्यांनी मार्गातील प्रत्येक पावलावर असामान्य समर्थन दिले,” ते म्हणतात. श्री. तिलाला यांनी आपल्या व्यवसायाकरिता यापूर्वी नोंदणी केलेले डोमेन्स GoDaddy कडे सोपवण्याची त्यांना इच्छा आहे. GoDaddy सोबतच्या त्यांच्या अनुभवाने ते बेहद्द खूश आहेत, आणि ते म्हणतात की ते आपले मित्र आणि व्यवसाय सहयोगी यांना GoDaddyच्या सेवांची शिफारस करतात.