indian-testimonial-abhishek-img-02-v01

PanelDraw सोल्युशन्स
श्री. अभिषेक बन्सल

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: PanelDraw सोल्युशन्स
वेबसाइट: paneldraw.com
स्थापना: मे 2013
GoDaddy आम्हाला मदत केली: एका कंपनीसोबत ऑनलाइन सेवांचे एकत्रिकरण - PanelDraw च्या आरंभिक यशाचे हे गमक आहे.
निष्कर्ष: आरंभ केल्यापासून काही महिन्यातच स़ॉफ्टवेअरचे 2,000 हून अधिक डाऊनलोड्स.

उत्पादनांची क्षणचित्रे

डोमेन: वैशिष्ट्यपूर्ण ऑनलाइन उपस्थितीमुळे PanelDraw सोल्युशन्सला निवडक उद्दीष्टित ग्राहकांमध्ये अधिकतम दृश्यमानता मिळाली.

वेब होस्टिंग: GoDaddy च्या विश्वासार्ह आणि वेगवान वेब होस्टिंगमु paneldraw.com सदैव कार्यरत ठेवले.

SSL प्रमाणपत्र: सुरक्षित व्यवहार आणि ग्राहक डाटा, विश्वासाचा एक अतिरिक्त स्तराची तरतूद.

SEO: ग्राहकांना सर्च इंजिन्सवर paneldraw.com शोधणे आणि सापडणे सोपे झाले.

याची सुरुवात एका ब्लूप्रिंटने झाली

“सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध केले जात आहे तर, आमचे सॉफ्टवेअर का नाही?” या मार्गदर्शक विचाराने श्री. अभिषेक बन्सल, M/S मॅग्नेटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक, यांनी आपल्या सॉफ्टवेअर प्रकल्पासाठी एक आभासी स्टोअर स्थापन केले. त्यांनी आपल्या पैतृक कंपनीची तंत्रज्ञान शाखा म्हणून PanelDraw सोल्युशन्सची स्थापना केली. नंतर त्यांनी आपले व्हर्चुअल स्टोअर, paneldraw.com ची मे 2013 मध्ये सुरुवात केली.

PanelDraw इलेक्ट्रीकल ड्राफ्टींग व्यावसायिकांसाठी इलेक्ट्रीकल पॅनेल डिझाइन सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरविते. ड्रॉईंग निर्मिती प्रक्रिया हे सोपी करते आणि डिझायनर्ससाठी तयारीचा वेळ लक्षणीयरित्या कमी करते. यातील टूल्सना कोणतेही अवजड इन्स्टॉलेशन लागत नाही, आणि सिस्टीम रिसोर्स आवश्यकता कमीत कमी ठेवण्यात आली आहे.

PanelDraw त्वरित आणि लवकर यशस्वी ठरली. या सॉफ्टवेअरची चाचणी आवृत्ती 2,000 वेळा डाऊनलोड झाली आहे, त्यामुळे श्री. बन्सल यांना भारतातील बाजारपेठांमध्ये असंख्य लीड्स आणि विक्री प्राप्त झाली. श्री. बन्सल आपला ऑनलाइन भागीदार, GoDaddy त्यांच्या यशासाठी धन्यवाद देतात. GoDaddy’ची उत्पादने आणि ऑनलाइन विपणन टूल्समुळे श्री. बन्सल यांच्या वेबसाइटला शोध इंजिन रँकींगमध्ये उच्च गुण मिळाले आणि दृश्यमानता वाढली.

मास्टर प्लान ऑनलाइन डिझाइन करण्यात GoDaddy मदत करते

श्री. बन्सल यांना Google सर्चमध्ये GoDaddy चा शोध लागला. GoDaddy.com ला भेट दिल्यानंतर, त्यांनी आपल्या वेबविषयक गरजा एका कंपनीकडे एकत्रिकृत करण्याचे ठरविले. उत्पादनाच्या ऑफर्स आणि आकर्षक किंमतींमुळे त्यांनी GoDaddy ची निवड केली. जगातील सर्वात मोठा नोंदणीकर्ता म्हणून GoDaddyच्या लोकप्रियतेमुळे देखील श्री. बन्सल यांना आपण योग्य निर्णय घेतल्याचा विश्वास मिळाला.

त्यांनी आपले डोमेन नाव GoDaddy यांच्याकडे नोंदवले आणि वेब होस्टिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन(SEO) आणि एक SSL प्रमाणपत्र समाविष्ट करुन ग्राहकांचे व्यवहार आणि वैयक्तिक डाटा सुरक्षित केला. ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया आणि सेटअप दरम्यान, श्री. बन्सल यांना त्यांची ऑनलाइन उद्दिष्टे गाठणे सहज असल्याचे लक्षात आले.

“GoDaddyच्या स्वतः करुन पाहा हा दृष्टिकोन प्रत्येक दृष्टिने सत्य होता, वेब विकासातील अगदी सामान्य व्यक्तीकरिता देखील” ते म्हणाले.

उद्देशानुसार दृश्यमानता प्राप्त करा

शोध इंजिन दृश्यमानता (SEV) बाबतGoDaddy ने paneldraw.com चे सर्च रँकींग्ज वाढविण्याचे आणि त्वरित संपर्क करुन देण्याचे वचन पूर्ण केले. GoDaddyच्या SEO सेवा वापरण्यातील श्री. बन्सल यांचा अनुभव अतिशय सोपा होता.

“सर्व अवजड कामे त्यांनीच केली,” ते म्हणाले.

GoDaddyच्या कीवर्ड जनरेटर सूचिमधून मदत घेऊन, श्री. बन्सल त्यांच्या वेबसाइटकडे योग्य ग्राहक आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम महत्वाचे शब्द निवडू शकले. आणि ते केवळ एका क्लिकमध्ये आपल्या वेबसाइटची 100 हून अधिक पृष्ठे आघाडीच्या शोध इंजिन्सकडे सादर करु शकले. शोध इंजिन दृश्यमानतेच्या रिपोर्टींग रचनेमुळे श्री. बन्सल यांना आपल्या वेबसाइटची रँक कशी वाढते आहे त्यावर लक्ष ठेवण्यात मदत मिळाली.

“याच्या यशाचा पुरावा खरोखरच संख्येमध्ये आहे,” श्री. बन्सल म्हणाले. “चाचणी सॉफ्टवेअर यापूर्वीच 2,000 हून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.

संरक्षणाची हमी

चाचणी सॉफ्टवेअरचा संपूर्ण परवाना प्राप्त करण्याासठी, श्री. बन्सल यांच्या ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्या पेमेंटचा तपशील ऑनलाइन समाविष्ट करावा लागतो. GoDaddy च्या SSL प्रमाणपत्रामुळे त्यांच्या वेबसाइटला विश्वास आणि खात्रीचा एक अतिरिक्त स्तर मिळाला. केवळ एका क्लिकमध्ये, श्री. बन्सल यांचे SSL प्रमाणपत्र स्थापित झाले, आणि काही मिनिटांतच ते जारी झाले.

GoDaddy SSL प्रमाणपत्रे भक्कम डाटा एनक्रिप्शन पुरवितात, आणि ते सर्व प्रमुख ब्राऊजर्सशी तुल्य आहेत. GoDaddy समर्पित ऑनलाईन आणि फोन समर्थन देखील ऑफर करतात. श्री. बन्सल यांना मनःशांती सापडली कारण GoDaddy त्यांचे प्रश्न आणि चिंतांवर उपाय करण्यास सदैव उपलब्ध होते.

सर्वोत्तम ग्राहक सेवा

श्री. बन्सल GoDaddy यांच्या ग्राहक सेवा टीमने वेळेवर दिलेल्या समर्थनाची प्रशंसा करतात. आपली वेबसाईट सेट अप करताना एका वेळी, श्री. बन्सल यांनी समर्थन टीमला एक समस्या सोडवण्यास संपर्क केला. ती समस्या पटकन आणि कार्यक्षमतेनं सोडवलेली पाहून ते खूश झाले.