indian-testimonial-paresh-img-02-v01

Suvidhaa Infoserve Pvt. Ltd.

श्री. परेश राजदे

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: सुविधा इन्फोसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड
वेबसाइट: www.suvidhaa.com
स्थापना: 2007
GoDaddy आम्हाला मदत केली: एक प्रीमियम डोमेन खरेदी करण्यामध्ये ज्यामुळे आमची प्रमाणित वेबसाइट शोधण्यास सोपी झाली आणि तिला जागतिक अस्तित्व आणि विश्वासार्हता प्राप्त झाली.
निष्कर्ष: सुविधा 65,000 किरकोळ विक्रेत्यांच्या नेटवर्क्सवर दरमहा जवळपास 400 कोटी रुपयांचे एकूण व्यवहार करते.

उत्पादनांची क्षणचित्रे

डोमेन: प्रीमियम डोमेनमुळे सुविधाला एक स्मरणीय ऑनलाइन ब्रँड तयार करण्यासाठी आणि वेबवर एक जागतिक प्रभाव टाकण्यात अधिक विपणन क्षमता प्राप्त होते.

सुविधा

‘सुविधा,’ सुविधा इन्फोसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड (SIPL) फ्रंचायजी, पेमेंट आणि रेमिटन्स कंपनी. येथे विविध सेवा एकत्रित केल्या आहेत - प्रवास, उपयुक्तता, ई-कारभार आणि मनोरंजन - भागीदार कंपन्यांकडून आणि व्यवहारांची सुलभता प्रदान करते. ग्राहक केवळ किराणा दुकाने, औषधांची दुकाने किंवा सायबर कॅफे येथे जातात आणि 65,000 पैकी एका ठिकाणी त्यांना हव्या त्या सेवांसाठी रोख रक्कम देतात. सुविधा आऊटलेट्स 20 दशलक्ष विशिष्ट आगंतुकांना सेवा देतात आणि दरमहा 3 दशलक्ष व्यवहार करतात.

.com हा आहे सोनेरी मानदंड

सुविधाचे उद्दिष्ट ग्राहकांना बिलं भरण्यास आणि व्यवहार ऑनलाइन हाताळण्यात सक्षम करणे हे आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, श्री. परेश राजदे, संस्थापक आणि अध्यक्ष SIPL, यांनी suvidhaa.com हे एक प्रीमियम डोमेन नाव, आपल्या व्यवसायाकरिता नोंदविण्याचे ठरवले. परंतु प्रथम, त्यांना हे डोेमेन अधिग्रहणाची पुष्टि करणे आणि आपल्या कंपनीच्या अंतर्गत भागिदारांचा पाठिंबा जिंकण्याची गरज होती.

“आमचा व्यवसाय जागतिक पातळीवर नेऊन आंतरराष्ट्रीय रेमिटन्स सेवा सुुरु करण्याची आमची इच्छा होती, म्हणून आम्हाला एक .com डोमेन नाव अधिग्रहित केल्याने ग्राहकांच्या दृष्टिकोनातून लक्षणीय परिणाम होईल का ते समजून घेण्याची इच्छा होती”, असे श्री. राजदे म्हणाले

सुविधाने एक सर्वेक्षण केले, आणि त्यातून एक .com डोमेन मालकीचे करण्याच्या उपयुक्ततेची पुष्टि झाली. श्री. राजदे यांना माहिती होते की एक .com खरेदी करणे म्हणजे सुविधाच्या भविष्यातील एक मौल्यवान गुंतवणूक होती, त्यामुळे एक विश्वासू भागीदार शोधणे हा पुढचा टप्पा होता.

श्री. राजदे आठवण सांगतात की GoDaddy सोबतचा त्यांचा अनुभव सहज आणि सहकार्याचा होता. प्रतिसाद अवधी जबरदस्त होता, आणि GoDaddy ने उपयुक्त सल्ला दिला.

एक प्रीमियम डोमेन नावाची नोंदणी करणे

suvidhaa.com सारखे प्रीमियम डोमेन्स आधीच मालकीचे असतात आणि एका प्रीमियम किंमतीवर विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. त्यांचे स्वरुप मूळ असते आणि इतर डोमेन्सपेक्षा ते अधिक विपणनक्षम असतात, कारण अनेक प्रीमियम डोमेन्सना यापूर्वीच लक्षणीय लोकांनी भेट दिलेली असते.

किंमती भिन्न असतात आणि विपणन क्षमता आणि आर्थिक प्रवाहांवर अवलंबून असतात. प्रीमियम डोमेन्स अधिग्रहित करणारे व्यवसाय बरेचदा डोमेनच्या स्थापित ऑनलाइन उपस्थिती आणि वर्तमान वेब व्यवहारांचे फायदे घेतात.

ग्राहक सेवा सर्वतोपरि

श्री. राजदे यांनी घेतलेला GoDaddy ची प्रीमियम डोमेन सेवा घेण्याचा निर्णय फायद्याचा ठरला. GoDaddy वैयक्तिक डोमेन खरेदी एजंटने सुविधाशी संपर्क केला आणि श्री. राजदे यांना suvidhaa.com खरेदी करण्यामध्ये मदत केली. हा प्रीमियम डोमेन व्यवहार अन्य कोणत्याही डोमेन खरेदीच्या इतकाच सुरळीत होईल याची खात्री त्या एजंटने केली.

GoDaddyचा ‘गुड अॅज गोल्ड’ पेमेंट पर्यायदेखील पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यात मदतीचा ठरला. भारतात नेट बँकींग आणि क्रेडीट कार्ड व्यवहार मर्यादित आहेत, आणि या पेमेंट पद्धतीमुळे सिविधाला बँक खात्यांच्या दरम्यान थेट पैसे हस्तांतरण करणे शक्य झाले.

“या प्रीमियम डोमेनसाठी पैसे देण्याशी संबंधित आम्हाला काही समस्या आल्या कारण भारतातील बँकींगचे नियम,” असे श्री. राजदे म्हणाले. “परंतु, ही समस्या एक आठवड्याच्या आत सोडवण्यात आली. GoDaddy च्या ‘गुड अॅज गोल्ड’ पेमेंट पर्यायामुळे आम्हाला रक्कम विनासायास जमा करता आली.”

रेमिटन्स सेवेशिवाय, सुविधाच्या संघाला GoDaddy ग्राहक सेवा संघाकडून मिळालेला सल्ला आणि त्वरित लक्ष यामुळे आनंद झाला.

“GoDaddy च्या सदस्यांनी आम्हाला प्रमाणाबाहेर जाऊन मदत केली,”श्री. राजदे म्हणाले. ”एकंदर समर्थन अतिशय असामान्य होते. सर्व स्तरातील एजंट आणि प्रतिनिधी अतिशय मदत करणारे आणि जाणकार होते. मला अतिशय समाधान आहे.”

एकएक लक्ष्य गाठताना, एकावेळी एक डोमेन

GoDaddy च्या ‘एक उल्लेखनीय समर्थन, ग्राहक सेवा आणि एकसंधी प्रीमियम डोमेन खरेदी नंतर, SIPL ने 80 अन्य डोमेन्स GoDaddy यांच्याकडे नोंदवली आहेत. ही डोमेन्स सुविधाच्या नावाचे प्रकार आहेत आणि यामध्ये सुविधाच्या मोबाईल धोरणाशी सुसंगत .mobi सारखे डोमेन नाम विस्तार समाविष्ट आहेत. ही कंपनी 2014 च्या आरंभी suvidhaa.com आरंभ करण्यास सज्ज होत आहे आणि तुमच्या .net आणि .in वेबसाइट्स suvidhaa.com कडे पुनःनिर्देशित करेल.

देशाच्या सर्वात मोठ्या, उच्च पुरस्कृत ग्राहक-केंद्रित सेवा आणि पेमेंट्ससाठी बाजारपेठेकरिता, एक प्रीमियम डोमेन म्हणजे सुविधाच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे.

वापरलेली उत्पादने