indian-testimonial-pranav-img-02-v01

The Great Indian Adventure
प्रणव चंद्रा, MD

पुन्हा अभिप्रायांकडे

एका दृष्टिक्षेपात
व्यवसाय: द ग्रेट इंडियन अॅडव्हेन्चर
वेबसाइट: www.thegreatindianadventure.com
स्थापना: 2008
GoDaddy आम्हाला मदत केली: जगभरातील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास.
निष्कर्ष: वेबसाइट सुरु झाल्यापासून दरमहा 15 चौकशी, यापैकी बहुतांश चौकशींचे विक्रीत रुपांतर झाले.

उत्पादनांची क्षणचित्रे

डोमेन: एक व्यावसायिक ऑनलाइन ओळखीमुळे GIA ला भारतातील आणि यु.एस., कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिगेतील संभाव्य ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत मिळाली.

ई-मेल: GoDaddy कडून व्यवसाय ईमेल मिळाल्याने GIA चा संवाद विश्वसनीय बनला आणि आमच्या ब्रँडमधील विश्वास निर्माण होण्यात मदत झाली.

क्षितीजे विस्तारताना

“भारतात, प्रत्येक गोष्ट एक साहस आहे,” असे प्रणव चंद्रा, एमडी, संस्थापक द ग्रेट इंडियन अॅडव्हेन्चर (GIA) यांनी सांगितलं.

GIA सुरु करणे, हे न्यू यॉर्कचे बँकर असलेल्या श्री. चंद्रा यांना नक्कीच धाडसाचे होते. श्री. चंद्रा यांनी भारतातील धाडसी प्रवासाची क्षमता ओळखली होती तर, त्यांना आव्हानं देखील दिसत होती - एक अस्सल भारतीय साहसाचा शोध घेणाऱ्यांना उपलब्ध माहितीचा अभाव, सोबत सहजपणे फसवलं जाण्याची जोखीमही होती.

2008 मध्ये स्थापित, GIA भारतीय प्रवासाचे अनुभव मजेदार आणि लवचिक बनविते. ही कंपनी साहसाचा शोध घेणाऱ्यांसाठी एकमात्र गन्तव्य स्थान आहे. यांच्या सहलींमध्ये थीमवर आधारित हॉलिडे पॅकेजेस ज्यामध्ये अध्यात्मिकतेपासून पर्यावरणातील पर्यटनापर्यंत सर्वकाही समाविष्ट असते.

GIA सहल-नियोजन सेवा देखील देते आणि जवळपास सर्वकाही आयोजित करुन देते - बटर चिकन टूर्स, मेडीटेशन ट्रीप्स, कुकींग लेसन्स, बॉलिवुड शूट्सना भेटी, एलिफंट फार्म्सच्या सहली आणि पोलो रिट्रीट्स. GIA चे ज्ञान, ग्राहकांनुसार दृष्टिकोन आणि तपशीलाकडे लक्ष यामुळे कंपनीकडे व्यवसायाचा ओघ सतत वाहात असतो.

मौखिक प्रचार हा GIA ला नवे ग्राहक मिळण्याचा प्राथमिक स्रोत असला तरी, श्री. चंद्रा यांनी जगभरातील अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी thegreatindianadventure.com ही कंपनी वेबसइट 2009 मध्ये स्थापन केली.

याचा फायदा झाला - GIA ला दर महिन्याला 15 हून अधिक व्यवसायिक चौकशी प्राप्त होतात, यापैकी बहुतांश यु.एस. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील असतात. श्री. चंद्रा आपल्या वेबसाइटची कामगिरी पाहून खूश आहेत आणि बहुतांश व्यवसायिक चौकशींचे रुपांतर व्यवसायात झाल्याचे सांगतात.

आभासी मोहीम

आपला व्यवसाय ऑनलाइन करण्याची वेळ आली तेव्हा, श्री. चंद्रा यांनी GoDaddy याची डोमेन नोंदणी आणि ईमेलसाठी निवड केली. लोकप्रियता, वापरण्यातील सुलभता आणि खर्च इत्यादि अनेक कारणांमुळे श्री. चंद्रा यांनी GoDaddy ची निवड केली. श्री. चंद्रा यांना मिळालेल्या उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे आपण योग्य ऑनलाइन व्यवसाय भागीदार निवडल्याची आठवण ते देतात.

“खरेदी करण्याचा टप्पा चांगला होता, सेटअप सोपे होते आणि आरंभा नंतरची कार्ये सुरळीत होती,” असे श्री. चंद्रा म्हणाले.

“मी एकदा GoDaddy ग्राहक सेवेला कॉल केला होता आणि मला उत्कृष्ठ अनुभव आला. ग्राहक सेवा कार्यकारीने फारच मदत केली, हुशार होता आणि माझ्या अनेक प्रश्नांची त्याने उत्तरे दिली. तिची वागणूक अतिशय संयमी होती.

भविष्यातील मोहिमा

श्री. चंद्रा यांच्यासाठी, GoDaddy उत्पादनांद्वारे अपेक्षेनुसार सेवा मिळाली. त्यांनी GoDaddyच्या पुरस्कारप्राप्त ग्राहक सेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भविष्यामध्ये, श्री. चंद्रा म्हणतात की ते अवश्य GoDaddyबद्दल प्रचार करतील.

वापरलेली उत्पादने