आपण आमच्या तज्ञाला कॉल करू शकता: 040-67607626

WordPress वेबसाइट

WordPress द्वारे शक्तिशाली वेबसाईट बनविण्याचा सर्वात सोपा मार्ग
  1. पूर्व-निर्मित वेबसाईट्सद्वारे पटकन सुरुवात करा
  2. जवळपास कोणतेही वैशिष्ट्य समाविष्ट करण्यासाठी मोफत प्लगइन्स इन्स्टॉल करा
  3. मोफत डोमेन, ईमेल, आणि समर्थन

WordPress ची शक्ती – सोप्या भाषेत.

आमचे वैशिष्ट्यपूर्ण Quick Start विझार्ड सर्व अत्यावश्यक पृष्ठे आणि वैशिष्ट्यांद्वारे पूर्व-निर्मित वेबसाईट्सद्वारे तुम्हाला वेगाने ऑनलाईन नेते. आम्ही उच्च दर्जाच्या हजारो इमेजेसची एक मोफत लायब्ररी देखील समाविष्ट करतो. शिवाय, आमचा हुशार ड्रॅग अँड ड्रॉप एडिटर मजकूर समाविष्ट करणे, इमेजेस एडिट करणे किंवा पानाची रचना पुन्हा करणे सोपे करतो. आणि जर तुमच्याकडे काही तांत्रिक कौशल्य असेल तर तुम्ही कल्पना करू शकता असे कोणतेही वैशिष्ट्य सामील करू शकता.

1000 उपलब्ध प्लगइन्समधून कोणतेही वैशिष्ट्य समाविष्ट करा.

सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्ये आमच्या प्रीमियम थीम्समध्ये अंतर्भूत आहेत, परंतु wordpress.org आणि वेबवर 43,000 पेक्षा जास्त उपलब्ध आहेत.

तुमच्यासाठी सर्व तांत्रिक कामे हाताळली जातात, आमच्या व्यवस्थापित होस्टिंग मंचाद्वारे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

WordPress काय आहे ?

WordPress ® हा एक ब्लॉग आणि वेब-प्रकाशन प्लॅटफॉर्म असून तो वापरण्यास अत्यंत सोपा तर आहेच शिवाय वेबसाइट बनविण्यासाठी जगभरात मानक मानला जातो. वेबसाइटचे सौंदर्य, वेब मानक आणि उपयुक्तता यांवर लक्ष केंद्रित करणारा WordPress हा एक मुक्त प्लॅटफॉर्म असून याद्वारे आपण छोट्याशा वैयक्तिक ब्लॉगपासून ते शेकडो पृष्ठांच्या मोठ्या कमर्शियल साइटपर्यंत सर्व काही व्यवस्थापित करू शकता. हजारो साइट्स WordPress ऑनलाइन उपस्थिती - आणि GoDaddy यांच्याकडील व्यवस्थापित WordPress होस्टिंगवर विश्वास ठेवतात.

मी WordPress चा वापर करण्यास कसे शिकावे?

तुम्हाला WordPress विषयी माहिती नसेल तर, सर्व उपलब्ध वैशिष्ट्यं समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच आम्ही 20+ व्हिडीओज समाविष्ट केले आहेत ज्यामध्ये सर्व मूलभूत गोष्टी आहेत. याशिवाय, जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट निर्मितीचे टूल म्हणून WordPress समुदाय https://wordpress.org/support/ येथे विनामूल्य समर्थन देतो

मी एखादी WordPress साइट दुसरीकडे होस्ट केली असेल, तर मी ती इथे हलवू शकतो काGoDaddy?

हो, तुमची सध्याची WordPress साईट आमच्या WordPress अनुकूलित होस्टिंग प्लॅटफॉर्मवर स्थानांतरित करणे अतिशय सोपे आहे जिथे अतिरिक्त सुरक्षा आणि व्यवस्थापित सेवा आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला सुयोग्य योजना निवडा, आणि सेट अप प्रक्रियेदरम्यान, "माझी साइट स्थलांतरित करा " निवडा. इतकं सोपं आहे हे. (आमचे ऑटो मायग्रेशन टूल WordPress.com साईट्ससोबत काम करत नाही.)

तुमची WordPress आवृत्ती इतरांच्या आवृत्ति पेक्षा वेगळी कशी आहे ?

आमच्याकडे अनेक अनोखी किंवा विशेष वैशिष्ट्ये आहेत, पण सर्वात मोठी आमच्या क्विक स्टार्ट विझार्डवर आहेत, जी तुमच्या साइटबद्दल विचारतात आणि स्वयंचलितपणे तुम्हाला हवी किंवा आवश्यक ती वैशिष्ट्ये प्रस्थापित करतात, आणि आमचा विज्युअल पेज एडिटर, WordPress च्या एडिटरला सोप्या ड्रॅग अँड ड्रॉप टूल्समध्ये सोपा करुन टाकतो. आमच्याकडे विशेष पूर्व-निर्मित वेबसाईट्स देखील आहेत, एक होस्टिंग प्लॅटफॉर्म जो WordPress साठी डिझाइन करण्यात आला आहे, 20 पेक्षा अधिक WordPress सूचनात्मक व्हिडीओजची एक ऑनलाइन लायब्ररी आणि बरेच काही.

मी खरेदी केल्यानंतर, सुरुवात कशी करावी?

ब्लॉग कसा तयार करायचा किंवा WordPress वापरून तुमची साइट तयार करायला सुरूवात कशी करायची याची माहिती नाही? काळजी करू नका!

तुमच्या होस्टिंग योजना अखंडपणे WordPress च्या नवीन आवृत्तीशी जोडलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही फक्त लॉग इन करून आपल्या कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन थेट साइट तयार करणे सुरू करू शकता. कसे लॉग इन करायचे हे माहित नाही? खालील “मी माझ्या WordPress इंस्टॉलेशन मध्ये कसा प्रवेश करू शकतो?” पहा.

आपल्याला कधीही प्रश्न पडल्यास, आमच्या पुरस्कार-प्राप्त समर्थन संघास संपर्क करतांना अजिबात संकोच करू नका. आमचे इन-हाऊस WordPress तज्ञ तुम्हाला वेबसाइट तयार करणे, अद्यतन करणे आणि अगदी आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.

मी माझ्या WordPress प्रस्थापनेमध्ये कसा प्रवेश करू शकतो/ते?

तुमच्या WordPress वेबसाइट किंंवा ब्लॉगवर लॉगइन करण्याचे अनेक मार्ग आहेत.

https://www.godaddy.com/, “माझे खाते” मध्ये लॉग इन करा आणि आपल्या उत्पादने सूचीमधून व्यवस्थापित WordPress होस्टिंग निवडा. जर तुमच्या डोमेनचे नाव coolexample.com असेल, तर http://coolexample.com/wp-admin, टाइप करा, ते तुम्हाला थेट प्रशासन लॉगइन स्क्रीनवर घेऊन जाईल.

4 अस्वीकारण
तृतीय-पक्ष लोगो आणि गुण यासंदर्भात संबंधित मालकांचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. सर्व हक्क राखीव